LokSabha Election 2024 साठी Uddhav Thackeray नेमकं काय प्लॅनिंग करतायेत? काय तयारी सुरुये? BolBhidu
#BolBhidu #UddhavThackeray #LoksabhaElections2024 #ठाकरेगट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागलाय. पण यात चर्चा होतेय ती ठाकरे गटाची. सेनेचे १३ खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले, पण या फुटीचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंना लोकसभा निवडणूक खूप महत्वाची ठरणारे. मग इतर पक्षांप्रमाणे ठाकरे गट तयारी का करत नाहीये ? असं विचारलं जातंय. पण ठाकरेंनी तयारी कधीच सुरु केलीये. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे त्यातील पहिला नई दुसरा टप्पा पार पडला आहे. त्यात प्रत्येकी १६-१६ लोकसभा जागांवर ठाकरे गटाने प्लॅनिंग सुरु केलं आहे. त्यासाठी ठाकरे मतदारसंघांतील शिवसेनेच्या आजी-माजी आमदार-खासदार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.
भले ठाकरे गटाकडून मोठाले, जाहीर कार्यक्रम होत नसले तरी मातोश्रीवर काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची सूत्र हलवली जातायत. पण या आढावा बैठकांची एका बातमीच्या पलीकडे चर्चा होताना दिसून येत नाहीये. पण लोकसभेसाठी ठाकरेंनी शांतीत क्रांती करण्याचा कार्यक्रम सुरु केलाय. या व्हिडीओद्वारे जाणून घेऊया लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची नेमकी तयारी कशी सुरुये ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/